नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021
51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-इफ्फीमध्ये जागतिक कीर्तीचे सिनेदिग्दर्शक-निर्माते सत्यजित रे यांना विशेष आदरांजली वाहिली जाणार आहे. या महोत्सवात सत्यजित रे यांचे निवडक चित्रपट बघण्याची संधी रसिकांना मिळेल. 2019 मध्ये झालेल्या इफ्फिच्या सुवर्णमहोत्सवात माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी ही घोषणा केली होती. सत्यजित रे यांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त ही विशेष आदरांजली वाहिली जाणार आहे.
या अंतर्गत, रे यांचे खालील चित्रपट दाखवले जातील:
- चारुलता(1964)
- घरे बाइरे(1984)
- पथेर पांचाली (1955)
- शतरंज के खिलाडी (1977)
- सोनार केला (1974)
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com