
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या मुंबई विभागातर्फे आज पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेस येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पद्मश्री पुरस्कार विजेते प्राध्यापक के. पदय्या यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रा .पदय्या यांच्यासह पद्मश्री मुरलिकांत पेटकर यांचाही सत्कार करण्यात आला
प्रा. पदया यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महात्मा गांधीजींचे विचार आजही संपूर्ण जगाला मार्गदर्शक असल्याचे सांगितले .आपले राष्ट्रीयत्व केवळ या अमृत महोत्सवी वर्षापुरते मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाचा भाग बनावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले . ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते प्रदीप मुनोत ,गांधी स्मारक निधीचे विश्वस्त उमेशचंद्र सारंगी . पुरातत्व विभागाचे अधीक्षक राजेंद्र यादव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
विविध सांस्कृतिक संस्थांच्या वतीने यावेळी अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले .
***
MaheshI/SushmaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai