केंद्रीय संचार ब्युरोद्वारे फाटक हायस्कूल रत्नागिरी आणि भाट्ये समुद्र किनारा येथे आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वप्रसिध्दीसाठी आयोजित योगाभ्यास कार्यक्रम संपन्न


azadi ka amrit mahotsav

 21 जून रोजी साजरा होणाऱ्या  आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्व लक्षात घेता योग ही काही काळ किंवा एखाद्या महत्त्वाच्या दिवशी करण्याची कृती नसून दैनंदिन आरोग्य राखण्यासाठी योगासने आणि इतर व्यायामांचे महत्त्व आहे हे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिनाला 51 दिवस उरले असताना काउंटडाउन टू आंतरराष्ट्रीय योग दिन  हा उलटगणती कार्यक्रम रत्नागिरीतील फाटक हायस्कूल येथे तसेच भाट्ये समुद्र किनाऱ्यावर पतंजली योग विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.

या वेळी योगाभ्यास, योग आधारित प्रश्नमंजूषा तसेच योगविषयी तज्ञांचे मार्गदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले. योग कौशल्य दाखवणाऱ्या योग साधक तसेच विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी फाटक हायस्कूल येथे क्षेत्रीय प्रचार अधिकारी महेश चोपडे फाटक हाय स्कूलचे मुख्याध्यापक किशोर लेले, पतंजलीचे योगतज्ञ भरत सावंत तर भाट्ये समुद्र किनाऱ्यावरील कार्यक्रमात क्षेत्रीय प्रचार सहायक प्रमोद खंडागळे, पतंजलीचे योगतज्ञ विद्यानंद जोग आणी इतर मान्यवर उपस्थित होते.

***

MC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

Source PIB